आपल्या तेजस्वी कांतीवर माधुर्याची तलम वस्त्रे लेऊन तऱ्हेतऱ्हेचे भावजडीत शब्दालंकार परिधान करून प्रसन्न, हसऱ्या चेहऱ्याने मला भेटते माझी भाषा.. कधी कठोर, तितकीच मृदू माता होऊन.. कधी अवखळ, अगदी नखरेल प्रेयसी होऊन.. तर कधी माझे वैफल्य छातीशी कवटाळून घेणारी समजूतदार सहचारिणी होऊन...
शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..
Monday, 27 February 2017
जन्म आपल्या मराठीचा !..
आपल्या तेजस्वी कांतीवर माधुर्याची तलम वस्त्रे लेऊन तऱ्हेतऱ्हेचे भावजडीत शब्दालंकार परिधान करून प्रसन्न, हसऱ्या चेहऱ्याने मला भेटते माझी भाषा.. कधी कठोर, तितकीच मृदू माता होऊन.. कधी अवखळ, अगदी नखरेल प्रेयसी होऊन.. तर कधी माझे वैफल्य छातीशी कवटाळून घेणारी समजूतदार सहचारिणी होऊन...
Subscribe to:
Posts (Atom)